Friday, August 8, 2008

एकदा मला स्वप्नात देव भेटला .......

एकदा मला स्वप्नात देव भेटला
त्याच्यापुढे मी एक प्रश्न ठेवला .....
"न्यायाच्या तुज्या राज्यात

प्रजेवर असा असा अन्याय का केला -
कोणाच्या पदरात सुख टाकले
तर कुणाच्या नशिबात दुख दिले... "
यावर तो हसून म्हणाला...
"माणसातली नाती गुफंताना

दोन्ही धाग्यांचा वापर मी केला
कुणाच्या नशिबात सुखाचे टाके पडले
तर कुणाच्या नशिबी दुःखाचे आले...
"उत्तराचा अर्थ मला उमगला...
तितक्यात तो चिंतेने बोलला -
"विणलेले धागे आता सुटू लागले आहेत

गुफंलेली नाती आता तुटू लागली आहेत...
माझ्या या 'माणुसकी'च्या राज्यात
'माणुसकी'च आता हरविली आहे !!! " ....

Monday, August 4, 2008

जगण्याचा अर्थ

जगण्याचा खरा अर्थ खुप लोकांना कळतच नाही
जीवन किती सुंदर आहे हे त्यांना उमगतच नाही
जीवनातील प्रत्येक क्षण मोलाचा आहे हे त्यांना पटतच नाही
म्हणुनच आनंदी राहून जगणे त्यांना जमतच नाही .................

जगण्याचा अर्थ मला मात्र उमगला आहे
हसत-खेळत जगण्याचा मंत्र मला सापडला आहे
जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मला मिळाला आहे
आणि म्हणुनच जीवनाला एक नवा अर्थ ...
आणि स्वतःला एक अर्थपूर्ण जीवन द्यायचे मी ठरविले आहे !!!

'चान्दणचुरा' - मैत्रिणीची रचना ..... आणि त्यावर माझी एक छोटीशी कविता !!!

दिवस तो सोनियाचा आला
सूर्य ही भल्या-पहाटे उगवीला
नभातुन आल्या चन्द्र-तारका
रातराणीचा सुगंध पसरला
मेघांनी वाजविले सनई-चौघडे
अन् मोर ही नाचत सांगत सुटला
की 'चान्दणचुरा' प्रकाशित झाला....